तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक वस्तू घालून गाठी बांधतात . नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. नैवेद्यत गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे दुःख दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते.(धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परिसरातल्या झाडांवर टाकतात. त्यामुळे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकनाशकांपासून रक्षण होते अशी भावना व्यक्त केली गेली जाते .
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा