गणपती विसर्जन…

पूजा विधी

गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन का करतात, काय आहे यामागचं शास्त्र, काय आहेत पुराणकाळातले दाखले

देशभरात दहा दिवसाच्या गणपतीची धूम सुरु आहे. मात्र अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन करण्यामागची कथाही तितकीच रंजक आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये लोक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा करत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे भाद्रपद महिन्यात गणेशाची चतुर्थी साजरी केली जाते. लोक हा सण भक्तिभावाने साजरा करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती ची पूजा केली जाते.त्याच वेळी, १० दिवसांनी नंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करण्यात येते . मात्र, काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवसांनीही गणपती बसवतात नंतर त्याचे विसर्जन केले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपती फक्त १० दिवसच का राहतो? १० दिवसांनी गणेश विसर्जन करण्यामागे एक खास कारण आहे, जे महाभारताशी संबंधित आहे.

पौराणिक कथेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला आहे .गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरूकरण्यात आले होते असे मानले जाते. महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची रचना केली हे तुम्हाला माहीत असेलच.

महर्षी वेद व्यास यांनी महाभारताच्या रचनेसाठी ते लिहून ठेवण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना करण्यात आली होती आणि भगवान गणेशाने लिहायला सुरुवात केली तर लेखणी थांबणार नाही असे देखील स्प्ष्ट केले होते. जर पेन थांबली तर तुम्ही तिथे लिहिणे बंद कराल. तेव्हा महर्षी वेद व्यास भगवान गणेशाला म्हणाले कि, हे भगवान, तुम्ही तुमच्या विद्वानांच्या अग्रभागी आहात आणि मी एक साधाभोळा ऋषी आहे, माझ्याकडून श्लोकांमध्ये काही चूक झाली असेल तर ती तुम्ही
दुरुस्त करून कुपया लिहून ठेवावी. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले आणि सलग १० दिवस महाभारताचे लेखन चालले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाभारत लिहिण्याचे काम संपूर्ण झाले तेव्हा श्रीगणेशाचा देह मृतावस्थेत तिथे होता. त्यानी अजिबातचं हालचाल न केल्यामुळे त्याच्या अंगावर धूळ आणि माती साचली होती. त्यानंतर श्रीगणेशाने सरस्वती नदीत स्नान करून आपल्या अंगावरील धूळ व माती साफ केली. यामुळेच गणपती बाप्पा ची मूर्ती १० दिवस बसवली जाते आणि त्यानंतर १० दिवसांनी अनंत चतुरथी च्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. 

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *