गणपती विसर्जन करण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे लागतात. विसर्जन पूजा सुरू करण्याआधी पूजेला लागणारे सगळे साहित्य पूजेच्या स्थानी आणून ठेवा.
विधी: पूजा करण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून नवीन किंवा स्वच्छ धुतलेले कपडे घालूनपूजेला बसावे . नंतर कपाळावरचंदनाचा किंवा कुंकाचा गंध लावून आसनावर बसून पूजा करावी.
दिशा: पूर्वे दिशेला तोंड करून पूजा करावी.
पूजन साहित्य: पूजेच्या विविध वस्तू आपल्या हातालगत ठेवाव्यात. हात धुण्यासाठी किंवा मूर्ती पुसण्यासाठी दोन वेगवेलगळ्या प्रकारचे कपडे पुजा करताना जवळ ठेवावेत. पूजा करण्यासाठी एका ताब्यांत शुद्ध पाणी भरून ठेवावे.
पूजा प्रारंभ
पूजेसाठी दिलेली प्रत्येक क्रिया वाचून तिचे अनुसरण करा. प्रत्येक क्रियेची माहिती व सूचना खाली दिलेली आहे.
दीपक पूजन: दिव्यात तूप घालून कापसाची वात लावा. दिवा लावल्यानंतर हात धुवा. नंतर दिवा मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.
(नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा.)
खालील तीन मंत्रापैकी प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हातावरून पाणी सोडा.
1. ओम केशवाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
2. ओम माधवाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
3. ओम गोविंदाय नम: स्वाहा…. (आचमन करा)
4. ओम ऋषीकेशाय नम: स्वाहा….(हातावर थोडे पाणी घेऊन ताम्हनात सोडा)
पवित्रीकरण पूजेसाठी खालील दिलेला मंत्र म्हणून उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी स्वत:च्या अंगावर व पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.व पाणी शिंपडताना हा मंत्र म्हणावा “भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपवित्र अवस्थेत असणारा मनुष्य देखील पावित्र्य प्राप्त करू शकतो.’
‘भगवान पुंडरीक्षा मला पावित्र्य प्रदान कर.’
ध्यान करून मंत्र: पठण करा सृष्टीच्या सुरवातीच्या काळात जे प्रकट झाले ते आज जगाचे परमकारण आहे. गणपती चार भुजाधारी आहे, गणपती गजवदन असल्यामुळे त्याचे दोन्ही कान सुपासारखे आहे, गणपतीला केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असूनही त्यांचा रंग लाल आहे. गणपती ला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले फार आवडतात.
त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश आहे , दुसर्या हातात अंकुश आहे , तिसर्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय आहे व त्याच बरोबर मुद्रेसोबत मोदक धारण केलेला आहे. गणपती बाप्पा चे वाहन उंदीर आहे. जो कुणी गणपतीची नेहमी पूजा/अर्चा करतो त्या व्यक्तीला योगीत्व प्राप्त होते.”हे गणराया! तुला प्रणाम करतो” हे वाक्य पूजा करतानी नेहेमी बोलावे .
स्नान, पंचामृत स्नान:
विधी:- सगळ्यात पहिले पाण्याने अंघोळ घालावी आणि त्या नंतर पंचामृताने अंघोळ घालावी आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालावे . या सगळ्या विधी ला क्रमश: स्नानिय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.
मंत्र:
स्नान समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): “हे देवा! माझ्या सर्व पापांचा नाश कर हे वाक्य बोलून, शुद्ध गंगाजलाने स्नान घालत आहे. तू त्याचा स्वीकार कर”.
पंचामृत स्नान: (पंचामृतापासून स्नान)
‘हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने तुला आंघोळ घालत आहे. तू त्याचा आनंदाने स्वीकार कर.’
शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):
‘हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी या नद्यां समाविष्ट आहेत. तू स्नानासाठी हे जलग्रहण कर.’
वस्त्र किंवा उपवस्त्र:
वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पण करा.
मंत्र:
ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणार्या ‘हे देवा! हे वस्त्र तुझ्या सेवेत अर्पण करतो. कृपया तू त्याचा स्वीकार कर आणि मला व माझ्या परिवाराला सुख शांती लाभू दे.
‘हे प्रभू! विविध प्रकारची चित्रे व नक्षीकाम असलेले वस्त्र तुला अर्पण करतो. कृपया तू या वस्त्राचा स्वीकार कर आणि मला व माझ्या परिवाराला सुख शांती लाभू दे’.
महागणपतीला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.
गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले,फुलमाळा व चंदन या साहित्यने पूजा करावी .
‘हे देवा! सुखदायक व सुंदर आणि सौभाग्याप्रमाणे लाल असणारा हा शेंदुर इच्छा पूर्ण कर्ण आहे . तुझ्या सेवेत हा लाल सिंदूर अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!
(दुर्वा अर्पण करावा)
‘हे प्रभु! जाईजुईची फुले व त्याच्या ओवलेल्या माळा पुजा करण्यासाठी आणल्या आहेत. तू त्याचा स्वीकार कर!’
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार करतो.
(वरील मंत्र म्हणून गंध, फुले किंवा फुलमाळा, शेंदूर व विविध सुगंधीत धूप दीप , दुर्वां, गुलाल इत्यादी अर्पण करा)
सुगंधित धूप
अगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.
मंत्र: अतिशय उत्तम सुगंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप गणपती ला अर्पण करावा ‘हे प्रभू! तुझ्या सेवशी समर्पित आहे. तू त्याचा स्वीकार कर.
महागणपतीला नमस्कार करून धूप अर्पण करा. (वरील मंत्र बोलून धूप सगळीकडे पसरवा)
यासाठी एक वेगळा दिवा लावला जातो. दिवा प्रजवलीत केल्या नंतर हात धुऊन खालील मंत्र म्हणा.
‘हे देवा! कापसाच्या वातीपासून बनवलेला प्रज्वलित दिवा तुझ्या चरणी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! हे माझ्या परमात्मा स्वरूप गणपती देवा! मी तुला हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! तू मला नरक यातनापासून वाचव. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा कर.’
महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
गणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई आणि अनेक प्रकारचे फळ त्यात केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत.
देवाला नैवद्य दाखवण्या पूर्वी दोन्ही हात जोडून प्रार्थना करा की या नैवद्याचे अमृत होऊ दे. त्यानंतर खालील मंत्र बोलता बोलता नैवद्य अर्पण करा.
मंत्र: ‘हे देवा! श्रीखंड, दूध, दही, तूपापासून तयार केलेले पदार्थं नैवद्याच्या रूपात अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर!’
‘हे देवा! तू हे नैवद्य ग्रहण करून तुझ्याप्रती माझ्या मनात असलेली भक्ती सफल कर. मला परलोकात शांती मिळू दे.’
(त्यानंतर खालील प्रत्येक मंत्र म्हणून पाणी सोडा)
1. ॐ प्राणाय स्वाहा
2. ॐ अपानाय स्वाहा
3. ॐ समानाय स्वाहा
4. ॐ उदानाय स्वाहा
5. ॐ व्यानाय स्वाहा
(त्यानंतर खालील मंत्र म्हणून पुन्हा पाणी सोडा)
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपती तुला नमस्कार!
आचमनासाठी, हस्त प्रक्षालनासाठी जल अर्पण करत आहे.
(पुन्हा पाणी खाली सोडा)
दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)
एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा म्हून इष्ट देवाला अर्पण केली जाते.
(खालील मंत्र म्हणून दक्षिणा व श्रीफळ गणपती चरणी अर्पण करा)
मंत्र: ‘हे देवा! हे श्रीफळ मी तुझ्यासमक्ष अर्पण केले आहे. तुझ्या आशीर्वादाने मला आयुष्यभर यश प्राप्त होऊ दे.’
महागणपतीला नमस्कार करून नारळ व दक्षिणा अर्पण करा.
महाआरती:
कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून आरती केली जाते.
महागणपती च्या चरणी नमस्कार करून निरंजन अर्पण करा.
(हात जोडून प्रणाम करा. आरती झाल्यावर हात धुवा)
पुष्पांजली :
विधी: हातात (शकतो पांढरी फुल घ्या) फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या आणि खालील मंत्र बोलून फुले देवाच्या चरणी अर्पण करा.
(खालील मंत्र बोलून पुष्पांजली अर्पण करा)
महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करा.
प्रदक्षिणा
(खालील मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करा. गणपतीला एकच प्रदक्षिणा मारली जाते)
मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा मारताना पावला-पावलावर नष्ट होतात.
महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करा.
प्रार्थना व क्षमाप्रार्थना
प्रार्थना: ‘हे गणराया! तू विघ्नांवर विजय मिळविणारा विघ्नहर्ता आहेस. देवांचा प्रिय आहेस.’ हे विनायका! तू ज्ञानसंपन्न आहेस. तुझ्या चरणी माझा नमस्कार असो. ‘हे देवा! माझ्या सर्व कार्यात येणार्या अडथळावचा व विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर.’
क्षमा प्रार्थना-
पूजा, विधी करताना चुकीच्या माहितीच्या अभावाने काही चुका होऊ झाल्या असतील तर, त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. त्यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.
‘हे प्रभू! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. मी स्वभावाने आळशी असल्या करण्याने तुझी मी नीट पूजा करू शकलो नाही.’
‘हे प्रभु! मी मनोभावे तुझी जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे तु माझ्यावर कायम प्रसन्न राहशील अशी अपेक्षा करतो.
प्रणाम किंवा पूजा समर्पण
विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे.
(प्रथम साष्टांग प्रणाम करा. त्यानंतर थोडे पाणी हातात घेऊन खालील मंत्र म्हणा व पाणी पात्रात सोडून द्या .)
मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महागणपती संतुष्ट होऊ दे.
विसर्जन:-
‘हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा! मी या पूजेत ज्या देवी देवतांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी व निरोग्य जीवनासाठी यावे.
(अक्षता व फुले मूर्तीवर वहावीत. )
आता खालील मंत्र म्हणून मूर्ती जागेवरून थोडीशी हलवा.
ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती:

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा