साहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ
कृती : घावन तयार करताना एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ टाकून नीट एकजीव मिश्रण करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे घावनाला शिजू द्यावे व उलटवून परतदो नी बाजूने शिजवून घ्यावे . छान जाळी पडते.
कृती : घाटले तयार करताना एक कपभर तांदळाच्या पीठात एक कपभर नारळाचे दूध घालावे . एक मोठा चमचा ओल्या नारळाचा किस,एक मोठा चमचा गुळ व चमचाभर वेलची पूड टाकून एकत्रित पाने मिश्रण तयार करून घ्या, व त्या नंतर गॅसवर ते मिश्रण शिजवत ठेवून द्या .गुळ विरघळला की गॅस बंद करा. ही कृती झालाय्वर घाटले तयार होते व घावना सोबत घाटले चविष्ट लागते.
आयुर्वेदीय गुणधर्म : घावन पचायला हलकी चव देणारी. मांस, रक्त, धातू वाढवणारी. घातले शक्ती देणारे अशक्त पणा कमी करणारे. वात कमी करून शरीराला शुद्ध ठेवणारे आहे.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
पुरणपोळी बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा