पुरणपोळी

नेवैद्य रेसिपी

साहित्य—

  1. ३०० ग्रॅम हरभरा डाळ
  2. ३०० ग्रॅम गुळ किंवा गुळ
  3. एक छोटा चमचा वेलची  पूड, जायफळआणि सुंठ
  4. १५० ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा
  5. पाणी

कृती :

  1. प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
  2. डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले उरलेले पाणी काढून घ्यावे. काढून घेतलेले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरतात.
  3. शिजलेल्या डाळीत त्यात गूळ घालून मंद आचेवर गॅस वर शिजवून घ्या. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ ची पूड घालावी.
  4. तयार झालेले पुरण पुरणाच्या चाळणीने किंवा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे , म्हणजे ते पुरण एकत्रित एकजीव होते.
  5. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची एकजीव अशी कणिक तयार करून घ्यावी . पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये किंवा पुरणाच्या पिठा मध्ये हळद वापरावी.
  6. नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी एक सिडने लाटत लाटत मोठी करून घ्यावी. तव्यावर मध्यम गॅस वर तेल किंवा आवडीप्रमाणे तूप लावून पोळी भाजून छान भाजून घ्यावी.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

साटोऱ्या बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *