घटक
- 1 कप घवाचे पीठ
- 1/2 कप चिरलेला गुळ
- 1 चमचे वेलची पावडर
- 1/2 कप तूप आवश्यकतेन
कुकिंग सूचना
- स्टेप 1 सर्वप्रथम सर्व साहित्याची तयारी करावी. गुळ चिरून घ्या, थोडेसे सुके खोबरे किसून घ्यावे, बदामाचे बारीक तुकडे करावे. आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. स्टेप 2
- त्यानंतर कढई मध्ये 1 चमचाभर तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये खोबऱ्याचा कीस आणि बदामाचे तुकडे परतून घ्या. परतून झाल्यावर लगेचच एका प्लेट मध्ये बाजूला काढा. स्टेप 3
- आता 2 -3 टेबलस्पून तूप कढई मध्ये घालावे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ ठाकून परतून घ्या व साधारण 7-8 मिनिटे परतून घ्यावे . गव्हाच्या पीठा मध्ये एक चमचा तूप घालून परतत राहावे. स्टेप 4
- आता गव्हाचे पीठ छान परतून घेतले आणि पिठाचा रंग ही बदलला. आता हे परतलेले पीठ, खोबरे आणि बदामचे तुकडे त्या मध्ये घालावे. त्यानंतर पुन्हा एकदा कढई मध्ये एक चमचा भर तूप घालावे ते गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये चिरलेला गूळ घालावा आणि परतत राहावा. गॅस बारीक ठेवावा. स्टेप 5
- आता गूळ विरघळून तयार झाला आहे, आता त्यामध्ये वेलची पूड घालावी आणि गॅस बंद करावा. वेलची पूड चांगली गुळामध्ये मिक्स झाली पाहिजे. आता लगेचच गुळाचा पाक आपल्या परतलेल्या गव्हाच्या मिश्रणा मध्ये सर्व बाजूनी घालावे आणि चांगले मिक्स करून घ्या. स्टेप 6
- आता मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर लगेचच लाडू तयार घ्या. तुम्हाला लाडू वळताना जर मिश्रण कोरडे वाटले तर त्यामध्ये थोडे थोडे तूप घालून लाडू तयार करू शकता. तुप आवश्यकतेनुसार घाला . स्टेप 7
- आता आपले गुल पापडी लाडू तयार झाले.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा