घटक
- १ जुडी अंबाडीची पानं (साधारण दीड कप भाजी चिरून)
- 1/4 कप तांदूळ
- 1/4 कप चणाडाळ
- ४-५ लाल सुक्या मिरच्या
- १२ पाकळ्या लसूण
- चवीनुसार मीठ
- 1 टेबलस्पून तेल
- 1/4 चमचा मोहरी
- 1/2 चमचा हळद
- चिमूटभर हिंग
- ४-५ मेथी दाणे

कुकिंग सूचना
- तांदूळ आणि चणाडाळ स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भांड्यात ६ तास भिजत घाला.
- अंबाडीची पानं काढून स्वच्छ धुवून घ्या. फक्त अंबाडाच्या भाजी चे पानं काढा – देठ घेऊ नका. पानं बारीक चिरून घ्या.
- डाळ, तांदुळातलं पाणी काढून टाका. आणि तांदूळ हाताने थोडे चुरून घ्या.
- एका पातेल्यात२ ते ३ पाली तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी तयार करा. फोडणीत मेथी चे दाणे टाका.
- लसूणच्या मध्यम तुकडे करून फोडणीत टाका आणि गुलाबी रंग येऊ पर्यंत परतून घ्या.लाल मिरच्यांना मध्ये चीर देऊन त्या फोडणीत टाका.
- आता त्यात चिरलेली अंबाडाच्या भाजी टाका व त्या नंतर भिजत घातलेले तांदूळ आणि चणाडाळ घाला. एकदा ढवळून झाकण ठेवून पाणी न टाकता वाफ काढा.
- मिश्रण बुडेल एवढं पाणी घाला. मीठ घाला.
- भाजी शिजवण्यासाठी मी प्रेशर कुकर वापरते. भाजीचे पातेले प्रेशर कुकर मध्ये ठेवून २ शिट्या केल्या की भाजी शिजते. तुम्हाला प्रेशर कुकर वापरायचा नसेल तर त्याच पातेल्यात मंद गॅस वर भाजी शिजवून घ्या आणि मध्ये मध्ये भाजीला हलवत राहा आणि लागले तर थोडे थोडे पाणी घाला.
- प्रेशर कुकर मध्ये शिजवलेली भाजी बाहेर काढून पातळ किंवा दाट हवी असेल त्यानुसार पाणी वापरा व आटवा. हे करताना गॅस बारीक ठेवा.
- चविष्ट आणि पौष्टिक अंबाडीची भाजी तयार आहे. भाकरी / पोळीबरोबर किंवा नुसतीच भाजी खायला द्या. खाताना वरून थोडं कच्चे शेंगदाणा तेल घातलं तर भाजी आणखी स्वादिष्ट लागते.
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
१६ भाज्यांची भाजी | मिक्स भाजी | बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा