विघ्नहर्ता गणपतीच्या गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताला सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते.
अथर्वशीर्षाचे पठण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात महत्त्वाचे आहे.
गणपती अथर्वशीर्षाचा विधी म्हणून पाठ केल्यास विशेष फळ मिळते. विहित दिवशी १०८ किंवा १००८ पाठ विहित दिवसांत (७, ९, ११, २१, ३१ किंवा ५१) पूर्ण करण्याचा संकल्प घेतला पाहिजे. कोणत्या उद्देशाने पठण करायचे आहे ते संकल्पात स्पष्टपणे नमूद केले पाहिजे.
गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याचे लाभ
गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने आपल्याला हे सर्व फायदे मिळतात-
गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने जीवनात सर्वांगीण प्रगती होते.
गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होऊ लागते.
आर्थिक समस्येमध्ये हळूहळू परंतु स्थिरपणे आर्थिक समृद्धी येते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे दूर होतात.
विचारांची नकारात्मकता दूर होते आणि विचार शुद्ध आणि पवित्र होतात.
गणपतीची कृपा जाणवू लागते.
सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात.
गणपति अथर्वशीर्ष पाठ विधी
सर्वप्रथम आसन घालून पूर्व, उत्तर किंवा ईशान ( उत्तर पूर्व मध्य ) दिशेकडे मुख करुन बसावे.
प्राणायाम
ॐ गं ॐ का उच्चारण करत तीनदा प्राणायाम करावा
आचमन
आत्मशुद्धीसाठी हातात गंगा जल किंवा शुद्ध जल घेऊन प्रत्येक श्लोकाचे उच्चारण करत आचमन ( आचमनीने जल ग्रहण करणे ) करावे –
ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः |
नंतर ॐ गोविन्दाय नमः उच्चारण करत हात धुवावे.
पवित्रीकरण
आपल्या उजव्या हातात गंगाजल किंवा शुद्ध पाणी घ्या आणि खालील श्लोकाचा उच्चार करून हे पाणी स्वतःवर आणि आपल्या आसपास शिंपडा.
ॐ अपवित्रः पवित्रो वा, सर्वावस्थांगतोऽपि वा। यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः।
ॐ पुंडरीकाक्ष: पुनातुः, ॐ पुंडरीकाक्ष: पुनातुः, ॐ पुंडरीकाक्ष: पुनातुः ।।
त्यानंतर लाकडी चौरंगावर पांढरे किंवा हिरवे कापड टाकून गणपतीचे चित्र किंवा मूर्ती आपल्यासमोर स्थापित करा. तुमच्याकडे मूर्ती असल्यास प्रथम गंगेच्या पाण्याने स्नान करवा आणि नंतर स्थापना करा.
ध्यान
शुक्ल यजुर्वेदातील खालील श्लोकांचे पठण करताना हातात काही फुले घेऊन गणपतीच्या रूपाचे ध्यान करा आणि नंतर त्यांच्या चरणी फुले अर्पण करा.
ॐ गणानां त्वा गणपति(गूँ) हवामहे प्रियाणां त्वा प्रियपति(गूँ)
हवामहे निधीनां त्वा निधिपति(गूँ) हवामहे वसो मम ।
आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम् ।
गणेश पूजा विधी Ganesh Pujan Vidhi
गणपती अथर्वशीर्ष (Ganpati Atharvashirsha) पाठ सुरु करण्यापूर्वी भगवान गणेशाचे पूजन करावे. सर्व प्रथम गणेशपूजेत गणपतीची स्थापना केल्यावर त्यांना चंदन किंवा सिंदूर लावून तिलक लावा आणि मग त्यांना यज्ञोपवीत अर्पण करून गजानन भगवान विघ्नहर्ता यांना पुष्पमाला अर्पण करा. लक्षात ठेवा की पूजेत तुळशीचे पान निषिद्ध मानले गेले आहे.
नंतर सुगन्धित धूप दाखवा. तुपाचा दिवा लावा आणि गणपतीला मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवा नंतर फळ अर्पित करा. आता परमेश्वराला जल अर्पण करा, त्यानंतर भगवंताच्या चरणी आपल्या भावना व्यक्त करा आणि त्यांना तांबूल (विडा, सुपारी, लवंगा आणि छोटी वेलची) अर्पण करा.
साहित्याच्या अनुपलब्धतेतही मानसिक उपासना करता येते, पाहिल्यास मानसिक उपासना अधिक श्रेष्ठ आहे कारण ही उपासना ध्यानावस्थेत केली जाते, यामध्ये डोळे मिटून तुम्ही समोर भगवंताची उपासना करता. आपण आपल्या देवाला जे काही अर्पण करतो ते शारीरिक स्वरुपात नसून मानसिक स्वरूपात असते.
लं पृथिव्यात्मकं गन्धं श्रीमहागणपतये समर्पयामि नमः
हं आकाशात्मकं पुष्पं श्रीमहागणपतये समर्पयामि नमः
यं वाय्वात्मकं धूपं श्रीमहागणपतये घ्रापयामि नमः
रं वह्नयात्मकं दीपं श्रीमहागणपतये दर्शयामि नमः
वं अमृतात्मकं नैवेद्यं श्रीमहागणपतये निवेदयामि नमः
सं सर्वात्मकं ताम्बूलं श्रीमहागणपतये समर्पयामि नमः
आता गणपतीच्या नावाचा जप दुर्वासह करा किंवा दुर्वा न मिळाल्यास अक्षत वाहत खालील नावांचा उच्चार करा.
ॐ बालविघ्नेशाय नमः
ॐ तरुणाय नमः
ॐ भक्तविघ्नेशाय नमः
ॐ वीरविघ्नकाय नमः
ॐ शक्तिविघ्नेशाय नमः
ॐ द्विजगणाधिपाय नमः
ॐ सिद्धिऋद्धिशाय नमः
ॐ उच्छिष्टाय नमः
ॐ विघ्नराजाय नमः
ॐ छिप्रनायकाय नमः
ॐ हेरम्बाय नमः
ॐ लक्ष्मीनायकाय नमः
ॐ महाविघ्नाय नमः
ॐ विजयाय नमः
ॐ नृत्तायनमः
ॐ उर्ध्वनायकाय नमः
आणि या नंतर मूळ गणपती अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात करावी .
अथर्वशीर्ष पठण झाल्यानंतर खाली दिलेली क्षमा प्रार्थना म्हणावी.
क्षमा प्रार्थना
भगवान गणपती पूजन आणि अथर्वशीर्ष पाठ पश्चात निम्न श्लोकाचे उच्चारण करत क्षमा प्रार्थना करावी –
आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम् । पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं, भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव! परिपूर्णं तदस्तु मे॥

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
गणपति अथर्वशीर्ष मराठी अर्थ सहित चे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा