अथर्वशीर्ष फलश्रुती व त्याचा अर्थ How to avail benifits of Atharvshirsh

पूजा विधी

|| श्री गणपत्यथर्वशीर्षम् ||

|| श्री गणेशाय नमः ||

अथर्वशीर्ष उपनिषद

ॐ भद्र (भद्रंग) कर्णेभिः श्रुणुयाम देवाः|

शान्ति पाठ

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः |

स्थिरैरङगैस्तुष्टूवांसस्तनूभिर्र् |            (स्थिरैरङगैस +तुष्टुवांसस+तनूभिर)

व्यशेम देवहितं यदायुः |                    (देवहितय् ॐ स्वस्ति ना इंद्रो वृद्धश्रवाः)

स्वस्ति न पूषा विश्ववेदाः |

स्वस्तितस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि |               (नस्तार र्क्ष्यो)

स्वस्तिनो नो बृहस्पतिर्दधातू |              ( बृहस्पतिर् दधातू )

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||

अथर्वशीर्ष ( उपनिषत ) 

हरी: ॐ | ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं ( प्रत्यक्षन् ) तत्वमसि |

त्वमेव केवलं (केवलंग) कर्तासि | त्वमेव केवलं ( केवलन् ) धर्तासि | त्वमेव केवलं ( केवलव् ) हर्तासि |

त्वमेव खल्विदं ब्रहमासि | त्वं( व् ) साक्षादात्मासि नित्यम् || 1 ||

||स्वरूप तत्व||

ऋतं (ऋतव्) वच्मि | सत्यं( सत्यव् ) वच्मि ||2||

अव त्वं माम् | अव वक्तारम | अव श्रोतारम् | अव दातारम् | अव धातारम | अवानूचानवमशिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात |अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात | अव चोर्ध्वातात् | अवधरात्तात | सर्वतो मां ( माम् ) पाहि पाहि समन्तात् ||3||

त्वं वाङमयस्त्वं चिन्मयः | त्वमानन्दमयस्त्वं ब्रहममयः | त्वं ( त्वंव् ) सच्चिदानन्दाद्वितीयोSसि | त्वं ( त्वंव्) प्रत्यक्षं ब्रहमासि| त्वं ( त्वन् ) ज्ञानमयो विज्ञानमयोSसि || 4 ||

सर्वं जगदिदं ( सर्वन् जगदिदन् ) त्वत्तो जायते| सर्वं जगदिदं ( सर्वन् जगदिदन् ) त्वत्तस्तिष्ठति| सर्वं जगदिदं ( सर्वन् जगदिदन् ) त्वयि लयमेष्यति| सर्वं जगदिदं ( सर्वन् जगदिदन् ) त्वयि प्रत्येति| त्वं भूमिरापोSनलोSनिलो नभः| त्वं (त्वन्) चत्वारि वाक्पदानि ||5||

त्वं (त्वंग्) गुणत्रयातीत:| त्वं (त्वंग्) देहत्रयातीत:| त्वं (त्वंग्) कालत्रयातीत:| त्वं मूलाधारस्थितोSसि नित्यम्| त्वं (त्वव्) शक्तित्रयात्मक:| त्वां (त्वाय्) योगिनो ध्यायन्ति नित्यम्| त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रेस्त्वमग्निस्त्वं| वायुस्त्वं सूर्यस्त्वं (सूर्यस्त्वन) चन्द्रमास्त्वं ब्रहमभूर्भुव:स्वरोम ||6||

|| श्री गणेश मंत्र || 

गणादिं (गणादिम्) पूर्वमुच्चार्यवर्णादिं (वर्णादिन्) तदनन्तरम्|

अनुस्वार: परतर: | अर्धेन्दुलसितम्|

तारेण ऋद्धम्| एतत्त्व मनुस्वरूपम्|

गकार: पूर्वरूपम्| अकारो मध्यमरूपम्|

अनुस्वार: श्चान्त्यरूपम्| (अनुस्वार:श् चान्त्यरूपम्)

बिन्दुरुत्तररूपम्| नाद: सन्धानम्|

संहितासन्धि:| सैषागणेशविद्या|

गणकऋषि:| निचृद्गायत्री छन्द:|

गणपतिर्देवता | ॐ गं गणपतये नम : ||7||

||श्री गणेश गायत्री मंत्र || 

एकदन्ताय  विद्महे| वक्रतुंडाय धीमहि| तन्नो दंति प्रचोदयात् ||8||

||श्री गणेश रूप मंत्र ||

एकदन्तंचतुर्हस्तंपाशमड्कुशधारिणम् | ( एकदन्तन् चतुर्हस्तम् पाशमंग् कुशधारिणम् )

रदं (रदन्) च वरदं (वरदव) हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्|

रक्तं (रक्तल) लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्|

रक्तगन्धानुलिप्ताड्गं रक्तपुष्पै: सुपूजितम्|

भक्तानुकंपिनं ( कंपनिन् ) देवं जगत्कारणमच्युतम |

आविर्भूतं (आविर्भूत न् ) च सृष्टादौ प्रकृतेः पुरुषात् परम् |

एवं ध्यायति यो नित्यं( नित्यव) स योगि योगिनां( योगिनाव् ) वरः ||9||

||अष्ट नाम गणपती मंत्र|| 

नमो व्रातपतये |नमो गणपतये | नमः प्रमथपतये |

नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय |

विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमुर्तये नमः ||10|

|| फलश्रुती||

एतदथर्वशीर्षं योSधीते स ब्रह्मभूयाय कल्पते|

स सर्वविघ्नैर्न (विघ्नैरन्) बाध्यते| स सर्वत: सुखमेधते|

स पंचमहापापात् प्रमुच्यते|

सायमधीयानो, दिवसकृतं पापं (पापन) नाशयति|

प्रातरधीयानो, रात्रिकृतं पापं (पापन) नाशयति|

सायंप्रात: प्रयुंजानो अपापो भवति|

सर्वत्राधीयानोSपविघ्नोभवति|

धर्मार्थकाममोक्ष (मोक्षन) च विन्दति|

इदम् अर्थवशीर्षम अशिष्याय न देयम्

यो यदि मोहाद् दास्यति स पापीयान् भवति|

सहस्त्रावर्तनात्| यं यं (यै यन) काममधीते    तं (तन्) तमनेन साधयेत् ||11||

अनेन गणपतिमभिषि न्चति

स वाग्मी भवति| चतुर्थ्यामनश्नन्जपति|

स विद्यावान भवति| इत्यथर्वणवाक्यम्|

ब्रहमाद्यावरणं (ब्रहमाद्यावरणव) विद्यात्|

न बिभेति कदाचनेति ||12||

यो दूर्वाड्कुरैर्यजति| स वैश्रवणो भवति| यो लाजैर्यजति|

स यशोवान् भवति| स मेधावान् भवति|

यो मोदकसहस्त्रेण यजति| स वांछितफलमवाप्नोति|

यः साज्यसमिद्भिर्यजति| स सर्वं (सर्वल) लभते स सर्वं (सर्वल) लभते ||13||

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति|

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जपत्वा|

सिद्धमन्त्रो भवति| महाविघ्नात् प्रमुच्यते| महादोशात प्रमुच्यते| महापापात् प्रमुच्यते|

स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद| इत्युपनिषत् ||14||

|| शांति मंत्र || 

ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यंन करवावहै | तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै| ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||

|| शान्ति पाठ ||

ॐ भद्र (भद्रंग) कर्णेभिः श्रुणुयाम देवाः|

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः |

स्थिरैरङगैस्तुष्टूवांसस्तनूभिर्र् |            (स्थिरैरङगैस +तुष्टुवांसस+तनूभिर)

व्यशेम देवहितं यदायुः |                    (देवहितय् ॐ स्वस्ति ना इंद्रो वृद्धश्रवाः)

स्वस्ति न पूषा विश्ववेदाः |

स्वस्तितस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि |               (नस्तार र्क्ष्यो)

स्वस्तिनो नो बृहस्पतिर्दधातू |              ( बृहस्पतिर् दधातू )

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||

अथर्वशीर्षाचे महत्त्व

  • अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिलेले आहे.
  • प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात दुसरी कृष्ण पक्षात येते.
  • कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
  • शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.
  • अथर्वशीर्षाचे वाचन/ पठण महिन्यात येणाऱ्या दोन्ही चतुर्थीला करावे. 

अथर्वशीर्ष ऐकल्याने किंवा वाचल्याने होणारे फायदे:

  • मानसिक शांतता प्राप्त होते.
  • मनावर नियंत्रण येते.
  • जीवनामध्ये स्थिरता येते.
  • कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात.
  • उच्चारण करण्याची क्षमता वाढते .

मानसिक शांतता व मनावर येणाऱ्या नियंत्रणामुळे माणसाची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जीवनात स्थिरता येते. कामांमध्ये येणाऱ्या अडचणींना तू सामोरे जाण्यास सक्षम होतो.

शान्ति पाठ अर्थ

सर्वप्रथम भगवान श्री गणेश यांना माझा नमस्कार असो. हे देवांनो आम्ही सदैव आपल्या कानांनी शुभ ऐकावे. आमच्या डोळ्यांना सदैव शुभ दिसावे. आमचे आयुष्य सदृढ अवयवांनी  देवांची पूजा करत घालवावी. || 1 ||

ॐ आपण आपल्या पूर्वजांकडून ज्याची स्तुती नेहमी ऐकली आहे असा इंद्र आमचे कल्याण करो. सर्व संपन्न संपूर्ण विश्वात, वेदांत ज्याची स्तुती आहे पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. गतिशील असणाऱ्या तार्क्ष्य (गरुड) आमचे कल्याण करो. देवगुरु बृहस्पती आमच्या कल्याण वृद्धिगत करो. || 2 ||

त्यानं रूपी तेज माझे रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. || 3 ||

अथर्वशीर्ष उपनिषद अर्थ

तिन्ही लोकात शांती असो. गणांचा नायक असलेला गणनायक, गणराज तुम्हाला माझा नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष आदि तत्व आहेस. तूच केवळ निर्माता आहेस. विश्वाला धारण करणारा ही तूच आहेस.

तूच  संहार करणारा आहेस. तूच सर्व ब्रम्ह आहेस. तू शाश्वत आत्मतत्व आहेस. ||1||

मी सत्य म्हणत आहे||2||

तू माझे रक्षण कर. तुझे पठण करणाराचे रक्षण करो. श्रोत्यांचे रक्षण कर. ज्ञान व उपासना देणाऱ्या गुरूंचे रक्षण कर. शिष्याचे रक्षण कर. मागच्या  दिशेने रक्षण कर. पुढच्या दिशेने रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. उद्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. दाही दिशांकडून रक्षण कर. रक्षण कर. || 3 ||

तू ब्रह्म, चैतन्यमय, आनंदरूप आहेस. तू सत चीत आनंद तत्व आहेस. तू विश्वातील  ज्ञान आहेस.|| 4 ||

या विश्वाची उत्पत्ती तुझ्यापासून आहे. जगात स्थिरता तुझ्यामुळे आहे. प्रत्येक जीव पुन्हा तुलाच येऊन मिळत आहे. तू पृथ्वी, तेज, वायु, आकाश, धरती पंचतत्वे तूच आहेस. तू रजस, सत्व व तमस या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तू स्थूलदेह, सूक्ष्म देह व कारण देहत्रयांच्या पलीकडे आहेस. || 5 ||

तू जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था, सुषुप्तावस्थाया तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा आहेस. तू भूत, भविष्य व वर्तमान या तीनही काळांच्या पलीकडचा आहेस. मूलाधार चक्रात तू नेहमीच आहेस. तू इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती या तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझे नेहमीच ध्यान करतात. तू ब्रह्मदेव, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच अग्नी,तूच वायू , तूच सूर्य, तूच चंद्र, तूच ब्रम्ह, तूच भूमी, तूच भूव ,तूच स्व:, तूच ॐ आहेस. || 6 ||

गणेश मंत्र अर्थ 

कार हे पूर्व रूप आकार हे मध्यम रूप अनुस्वार हे अंत रूप व बिंदू हे तिन्ही रूपांना व्यापणारे उत्तर रूप आहे. या सर्वांचे एकीकरण करणारा नाद म्हणजेच संधी होय. हीच गणेश विद्या आहे. या मंत्राचा ऋषी गणक आहे.  या मंत्राचा निच्ऋग्दायत्री हा छंद आहे. गणपति देवता आहे.

“ॐ  गण गणपतये नमः” हा अष्टाक्षरी मंत्र आहे. || 7 ||

कार हे पूर्व रूप आकार हे मध्यम रूप अनुस्वार हे अंत रूप व बिंदू हे तिन्ही रूपांना व्यापणारे उत्तर रूप आहे. या सर्वांचे एकीकरण करणारा नाद म्हणजेच संधी होय. हीच गणेश विद्या आहे. या मंत्राचा ऋषी गणक आहे.  या मंत्राचा निच्ऋग्दायत्री हा छंद आहे. गणपति देवता आहे.

गणेश गायत्री अर्थ 

आम्ही एकदंता ला जाणतो. वक्रतुंड यांचे ध्यान करतो. हे करण्यासाठी  एकदंता नी आम्हास प्रेरणा द्यावी. || 8 ||

गणेश स्तुती रूप 

(गणेश अभिषेक करताना हा मंत्र म्हणतात)

 एक दात असलेला, चार हात असलेला पाश, अंकुश, दात व वरद मुद्रा धारण करणारा.ज्याच्या ध्वजावर मूषक चे चिन्ह आहे.तांबड्या रंगाचा. ज्याचे उदर मोठे आहे असा. सुपासारखे मोठे कान असलेला. रक्त वस्त्र( लाल रंगाचे वस्त्र) धारण करणारा. गंधाने ज्याचे अंग माखलेला. तांबड्या पुष्पांनी ज्याची पूजन केले जाते असा. भक्तांवर दया करणारा . अविनाशी असा. सृष्टीच्या आधी प्रगट झालेला. प्रकृती पुरुष या पलीकडचा देव. योगिमध्ये श्रेष्ठ असा देव. || 9 ||

अष्ट गणपतींची नावे

  1. व्रातपतये
  2. गणपतये
  3. प्रमथपतये
  4. लंबोदराये
  5. एकदंताय
  6. विघ्ननाशिने
  7. शिवसुताय
  8. वरदमूर्तये

अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकाला नमस्कार असो. || 10 || 

फलश्रुती अर्थ

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करेल त्याला ब्रह्मरूप मिळेल. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. सर्व बाजूंनी त्याच्या सुखात वाढ होते. महापापांपासून मुक्ती मिळते. संध्याकाळी पठण केल्याने दिवसभरातील पापांचे नाश होते. सकाळी पठण केल्याने संध्याकाळी होणाऱ्या पापांचे नाश होते. सर्व ठिकाणी अध्ययन करणारा मुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवतो. भक्तिभाव नसलेल्या माणसाला अथर्वशीर्ष पठण करू नये. अथर्वशीर्ष एक हजार वेळा भक्तीभावाने वाचल्याने मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होतील. || 11 || 

गणपतीचा अभिषेक करताना अथर्वशीर्षाचे वाचन जो करेल तो उत्तम वक्ता होईल. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता अथर्वशीर्षाचा जप केला तर विद्या संपन्न होईल. असे अथर्वण ऋषींचे वाक्य आहे. जी व्यक्ती जप करेल तिला कधीच भीती वाटणार नाही. जो  दुर्वा अर्पण करेल तो कुबेर समान होईल. जो साळीच्या लाह्या यांनी हवं करेल तो यशस्वी बुद्धिमान होईल. || 12 ||

जो सहस्त्र मोदकांनी हवं करेल त्याला  मनोवांचीत फलाची प्राप्ती होईल. सर्व काही प्राप्त होईल. || 13 ||

आठ ब्राह्मणांना योग्यप्रकारे उपदेश करणारा सूर्यासारखा तेजस्वी होईल. सूर्यग्रहणात महा नद्यांच्या किनारी किंवा गणपतीच्या प्रतिमेसमोर जप केल्यास हा मंत्र सिद्ध होईल.महाविघ्ना पासून मुक्तता मिळेल.महा दोषांपासून मुक्तता मिळेल. महा पापातून मुक्तता मिळेल. तो सर्वज्ञ होतो. सर्व संपन्न होतो. जो हे सर्व असे जाणतो असे उपनिषद् आहे. || 14 ||

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

गणपती अथर्वशीर्ष पाठ संपूर्ण विधी आणि लाभ याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *