डॉ. प्रतिभा औंधकर – Dr. Pratibha Aundhakar , Nashik

डेकोरेशन

नाशिक: नाशिकमधील घराघरांमध्ये श्री महालक्ष्मी गौराईचे आगमन व पूजन आनंदात व उत्साहात पार पडले. गौराईच्या आगमनानंतर सवाष्ण भोजनसमयी पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला गेला . घरोघरी हळदीकुंकू समारंभात अनेक महिलांनी परस्परांच्या घरी जाऊन हळदीकुंकू व प्रसादाचा स्वीकार केला . नाशिकमधील प्रथितयश डॉक्टर व रेडक्रॉस वैद्यकीय अधिकारी तसेच राज्य रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतिभा औंधकर यांच्या घरीही महालक्ष्मी गौराईचे आगमन आनंदात झाले. ” गणेशोत्सव व महालक्ष्मी यासारख्या सणांमधील विविध प्रथांमुळे निसर्ग आणि आपल्यातील नटे घट्ट होत जाते . परस्परांतील स्नेह वाढीस लागतो व एक अत्त्युच्च आनंद त्यातून मिळतो. सोशल मीडियातून भारतीय संस्कृतीचा परिचय इतर सर्वांना होतो. शिवाय पुढील पिढीवर चांगले संस्कार यामुळे घडतात. ” असे प्रतिपादन डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले . सौ. अलका कोळेकर, सौ. शोभा नागरे , सौ. सुजाता खोडे , मालन शिंत्रे आदींचे साहाय्याने गौराईचे आगमन संपन्न झाले . ज्येष्ठ कनिष्ठा गौरींची श्री गणेशासमवेतची प्रसन्न आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . यावेळी दर्शन , पूजन आणि प्रसादासाठी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *