नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न झाली. के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखा, कॉलेज मधील विद्यार्थी, तसेच असंख्य गणेशप्रेमी असा एकूण ३००० मूर्तिकारांनी कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या आकर्षक मूर्ती साकारल्या. या गणेश मूर्तींची विविध गणेश मंडळे तसेच घरोघरी स्थापना होणार असल्याने संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, ट्रस्टी अजिंक्य वाघ, प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, प्राचार्य पी. टी. कडवे, संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी. यांनी समाधान व्यक्त केले.
के. के. वाघ शिक्षण संस्था , स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्सचेंज व स्पिनॅच सेंटर ऑफ एक्सलन्स या संस्थांच्या संयुक विद्यमाने श्री अजिंक्य वाघ यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. संस्थेच्या फाइन आर्ट महाविद्यालयाच्या कला शिक्षकांमार्फत शाडू मातीपासून गणपतीची मूर्ती करण्याचे प्रशिक्षण यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेत बालवाडी पासून ते महाविद्यालीन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला . सुमारे २८०० ते ३००० वेगवेगळ्या आकारातील सुबक गणेश मूर्ती साकार करण्यात आल्या .
कार्यशाळेचे उद्घाटन दैनिक लोकमतचे निवासी संपादक श्री. कुळकर्णी यांनी केले. आपल्या भाषणात ते म्हणाले पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा ही काळाची गरज असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी श्री अजिंक्य वाघ हे गेल्या नऊ वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत असे गौरवोद्गार काढले. या गणेश मूर्तीची प्रत्यक्षात स्थापना करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी अजिंक्य वाघ, प्राचार्य. डॉ. के. एन.नांदुरकर. प्रा. बाळ नगरकर, जनसंपर्क अधिकारी संजीव अहिरे, प्रा. सचिन जाधव, श्री. एस. पी. क्षीरसागर, श्री मकरंद हिंगणे, प्रा . नानासाहेब गुरुळे, प्रा. सांगळे, प्रा. योगेश गायधनी, प्रा. पियूष जोशी तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सारंग नाईक यांनी केले