गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी

प्रसिद्ध मंदिर

गणपतीपुळे मध्ये असणारे स्थित रत्‍नागिरीत तालुक्यातील २७४.६४ हेक्टर इतके क्षेत्राचे गाव तेथे स्थित आहे . ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे.

पर्यटन

गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वत:ची शैली आहे अशी मान्यता तिथल्या भाविकांनी दिली आहे. सह्याद्री पर्वतातात वसलेली गणपतीची नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या जवळच पश्चिम दिशेला असलेला अरबी समुद्र आहे. त्यामुळे हे गणपती चे देऊळ निरळीत आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला स्थित असल्या कारणाने प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे गरजेचे असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग आहे त्यात समुद्र वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय अद्भुत आहे. गपतीपुळे या ठिकाणी समुद्र आणि रावेदार वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास पाहण्यास मिळते. पर्यटक शक्यतो सुट्ट्या मधे गणपती पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर व नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे तीर्थस्थान कडे जाण्यासाठी थेट बससेवा उपलध्द आहे .

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ चे विश्रामगृह तिथे आहे. त्याऐवजी मंदिरातील गुरुजींच्या निवासस्थानी सुद्धा उत्तम राहण्याची सोय असते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात.

माहिती

गणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्‍नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आजूबाजूचा निसर्ग व परिसर अतिशय सुखद आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एसटीची आरामदायी बस सेवा उप्लद्भ आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे ओलांडल्यावर ६ किलोमीटर अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळ चं सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज स्थित आहे. इथून जवळच २ किलोमीटर अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक उभारले आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर स्थित असलेले सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आजूबाजूच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सवा च्या काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याला असलेलेला लंबोदर हाच या सर्व भाविकांचा गणपती आहे येथील भाविकांची ख्याती आहे.

त्याच रस्त्याला खेटून रत्‍नागिरीच्या दिशेने जाताना “आरे वारे” हा निसर्गरम्य एक सनसेट पॉइन्ट आहे. “नवरा माझा नवसाचा” आणि “फुल थ्री धमाल” ह्या प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्‍नागिरी शहर हे सगळ्यात जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.

रत्‍नागिरी शहरतून १०-१५ मिनिटांनीचं गणपतीपुळे ला जाण्यासाठी आरामदायी बसेस उपल्ध आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *