नाशिक: आज शुक्रवार रोजी शहरात असंख्य घरांमध्ये श्री महालक्ष्मी गौराईचे पुजन मोठ्या उत्साहात पार पडले. काल गौराईचे आगमन झाले. आज सौभाग्यवतींना सवाष्ण म्हणून भोजनास सांगून, पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. घरोघरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. अनेक महिला परस्परांच्या घरी जाऊन हळदीकुंकू घेतात व प्रसाद स्विकार करतात. शहरातील सुयश क्लासेसच्या संचालिका सौ स्नेहल जयंत मुळे यांच्या घरीही महालक्ष्मी गौराईचे आगमन झाले. त्याबद्दल त्या म्हणाल्या ” गेल्या अनेक वर्षांपासून त्या हे पुजन करतात व त्यांच्या ” मुळे ” घराण्यातील ही परंपरा आम्ही पुढे चालवत आहोत. भारतीय संस्कृतीचे जतन व पुढील पिढीवर चांगले संस्कार यामुळे घडतात. ” यावेळी त्यांचे पती प्रा. जयंत मुळे, मुलगा सुयश मुळे, कन्या सौ चैताली भट व अनेक महिला उपस्थित होत्या.