गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिनातल्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाप्रमाणे महालक्ष्मी/गौरी घरोघरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा/अर्चा केली जाते व महानैवेद्यचा प्रसाद ही दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीगणपतीलाच महालक्ष्मी असे ही म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठ गौरी असे म्हणतात.
आशय व महत्व
महालक्ष्मीचा सण हा कुळधर्मचा असून सर्व जाती-जमातीतून भावनापूर्वक पाळला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्या कारणाने स्त्रिया धान्याची राशी मांडून महालक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मी व गौरीच्या मांडणीत वेगवेगळे पणा असला तरी मूळ हेतू धान्य आहे.
वा.शि.आपटे यांच्या संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार ‘गौरी’ म्हणजे आठ वर्षाची,आदिष्ट अशी पवित्र कन्या आहे . तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, पत्नी, तुळशीचे झाड, जाईची वेल याही अर्थने मानले जाते .याचं पद्धतीने तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा/अर्चा केली जाते.
गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
गौरी ही गोधासना असावी. गौरीला चार हात, तीन डोळे असावेत आणि ती अलंकारनी सजलेली असावी, असे म्हटले आहे. सध्याच्या स्तिथीला गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा फार बदलल्या आहेत. कोणाकोणा कडे गौरायांचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे किंवा दगड आणून त्यांची पूजा/अर्चा करतात. काही घराघरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एक किंवा दोन धान्याचे ढीग करून त्यावर गौरायांचे मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या रांजण मिळतात. त्यावर गौरायांचे मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी घालतात . तेरड्याच्या फुलाची ही गौर असते. तेरड्याच्या फुलांची रोपे मुळासकट असतात . ही मुळे म्हणजेच गौरायांची पावले होय , अशी श्राद्धा भाविकांच्या मनात आहे .आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धती पासून ते गौरीच्या रूपापर्यंत नवनवीन आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेकांच्या घरांत गौरी/महालक्ष्मी येत असतात . आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात योग्य वेळ बघून मुखवट्यांची आणि गोरायांच्या हातांची पूजा होते. त्यानंतर त्याच रात्री गौरी उभ्यारल्या जातात. गौरी/महालक्ष्मी त्यांचे मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी)त्याच्या सोबत मांडले जातात. कोणीकोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, तर कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. अश्या प्रकारे घराघरांत गौरी गणपती ची पूजा होत असते .

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
ज्येष्ठागौरी आवाहन मराठी माहिती ,गौरी पूजन कथा याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा