अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. दोन्ही खिरापती तयार करायला अगदी सोप्या आहेत. गोवा या शहरात एका विशिष्ट पद्धतीनं पंचखाद्य खिरापत केली जाते गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान हा खोबऱ्याच्या खिरापतीलाचं असतो . वाळलेल्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते. सुक्या खोबऱ्याची खिरापत असू देत किंवा पंचखाद्य दोन्ही आरोग्यास फायदेशीर असतात. दोन्ही खिरापती तयार करायला अगदी सोप्या आहेत. गोव्यात पंचखाद्य खिरापत करताना ही देखील ओलं खोबरं वापरले जाते तर इतरत्र पंचखाद्य खिरापतीसाठी वालेले खोबरे वापरण्याची ही पध्दत आहे.
सुक्या खोबऱ्याची खिरापत
सुक्या खोबऱ्याची खिरापत करण्यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यावा , अर्धी वाटी पिठीसाखर घ्या , 4 चमचे खसखस घ्या , चारोलया , थोडे काजू बदामाचे तुकडे आणि वेलची पूड घ्या. खिरापत तयार करताना सर्वात आधी खोबऱ्याची काळी पाठ काढून घ्या. खोबरं किसून घ्यावं. कढईत खोबऱ्याचा किस मंद गॅस वर खरपूस लालसर भाजून घ्यावा . नंतर कढईत खसखस थोडी गरम करुन घ्या. खोबऱ्याचा किस हाता ने जितका शक्य होईल तितका बारीक करून घ्यावा. खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे खिरापतीच्या कुरकुरीतपणा निघून जातो. खसखस १ चमचा भर चवीनुसार साखर घालून वाटून घ्यावी. चुरलेल्या खोबऱ्याच्या किसात बारीक केलेली खसखस, पिठीसाखर ,काजूचे तुकडे, चारोलया आणि जायफळ व वेलची पूड टाकून खिरापत चांगली एकत्र करून घ्यावी . खोबरं छान खरपूस भाजलया ने भरपूर खिरापत दिवस टिकते.
पंचखाद्य खिरापत
पंचखाद्याची खिरापत करण्यासाठी पाऊन कप किसलेले सुके खोबरे, 1 चमचा खसखस, वाटीभर खडीसाखर, खारीकचे तुकडे किंवा खारीक पावडर आणि बदामाचे तुकडे घ्या. पंचखाद्य खिरापत करताना सर्वांत आधी खोबऱ्याची पाठ काढून त्यानंतर खोबरं किसून घ्या. खारिकमधल्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या किंवा खारीक थोडी गरम करुन मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. खोबरं कढईत मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावं. भाजलेलं खोबरं बाजूला काढून ठेवून त्याच कढईत् खसखस भाजून ती मिक्सरमधून वाटून घ्यावी. बदामाची पूड आणि खारकेची पूड थोडी गरम करून घ्यावी. खडीसाखर ओबडधोबड वाटूअन् घ्यावी. भाजलेलं खोबरं हातानं चुरावं. त्यात खसखस, बदामाची पूड व तुकडे, खारीकेची पूड व तुकडे, खडीसाखर आणि वेलचीपूड घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या . हे मिश्रण फक्त एकदाच मिक्सरमधून् बारीक करून घ्यावं किंवा मिक्सरमधूनबारीक नाही केले तरी चालेल.
गोव्याची पंचखाद्य खिरापत
– गिरिजा मुरगोडी, गोवा
गोव्यात ओल्या खोबऱ्याची पंचखाद्य खिरापत गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि गणपती उठण्याच्या शेवटच्या दिवशी केली जाते. ही पंचखाद्य खिरापत करण्यासाठी वाटीभर ताजं खोवलेलं खोबरं, खमंग भाजलेली थोडी मूगडाळ, काजूचे बारीक केलेले तुकडे, वेलची पावडर, मूठभर ज्वारीच्या लाह्या आणि अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ ही सामग्री घ्यावी. ही खिरापत करताना खोबरं आधी खोवून घ्यावं. गूळ किसून घ्यावा. मूगडाळ खमंग भाजून घ्यावी. काजूचे बारीक तुकडे करावेत. कढईत खोवलेलं किंवा किसलेलं खोबरं आणि गूळ एकत्र करुन हे मिश्रण गूळ वितळे पर्यंत गरमकरून घ्या . गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मिश्रण गार झालं की त्यात मूगडाळ, काजूचे तुकडे आणि लाह्या घालून खिरापत चांगली एकत्र करावी.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
उकडीचे मोदक बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा