ज्वारीच्या पिठाची आंबील

नेवैद्य रेसिपी

घटक

  1. 2 वाट्या ज्वारीचे पीठ
  2. 1 टेबलस्पून तीळ
  3. 1 टीस्पून तिखट
  4. चवीनुसार मीठ
  5. 2-2.5 ग्लास पाणी

कुकिंग सूचना

ज्वारीचे पीठ एका भांड्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून अंदाजे एक ते दिड ग्लास पाणी टाकून सैलसर भिजवून घ्यावे. आणि 24 तास बाजूला झाकून ठेवावे.

24 तासानंतर पीठ चमच्याने ढवळून घेतले. आता एका भांड्यात 1 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले (आंबिल थोडी पातळ च असते त्यामुळे तुमच्या आवडी नुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता). त्यात थोडे तिखट, मीठ आणि तीळ घालून मिक्स करून घ्या .

पाण्याला उकळी आल्यावर त्यात ज्वारीचे पीठ थोडे थोडे करून ओतायचे आणि सारखे ढवळत राहावे. मंद आचेवर शिजू द्यावे.

साधारण 8 ते 10 मिनिट झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा. ज्वारीच्या पिठाची आंबील तयार आहे. त्यात थोडे तेल घालून सर्व्ह करा. किंवा आवडत नसेल तर अशीही फारच चवीष्ट लागते

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

अंबाडीची भाजी बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *