कनिपक्कम मंदिर

प्रसिद्ध मंदिर

श्री गणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्याची आजही आपल्याला प्रचिती मिळते . यातीलच एक प्रचिती चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात आपल्याला अनुभवास मिळत आहे . कनिपक्कम गणपती मंदिर अशा विविध कारणांमुळे प्रसिध्द आहे . या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज बदलत असल्याचे त्या ठिकाणच्या भाविकांना जाणवते . ही गणेशाची मूर्ती आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एका नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात विराजमान आहे. कनिपक्कम गणपती मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी श्रीगणेश लवकर दूर करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अशी झाली या मंदिराची स्थापना

या मंदिराची निर्माण कथा अत्यंत रोचक आहे. कथेनुसार या ठिकाणी तीन भाऊ वास्तव्यास होते. या तीन भावामध्ये एक भाऊ मुका, दुसरा भाऊ बहिरा आणि तिसरा भाऊ अंध होता. तिघांनीही उदरनिर्वाहासाठी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला होता. जमिनीवर शेती करण्यासाठी पाण्याची गरज होती. यामुळे तिघांनीही या ठिकाणी विहीर खोदण्याचे काम सुरु केले. काही काळानंतर जमिनीतून पाणी निघाले. त्यानंतर आणखी खाली खोदल्यानंतर एक दगड दिसून आला. तो दगड काढल्यानंतर तेथून रक्ताची धार निघाली. थोड्याचवेळात संपूर्ण पाणी लाल झाले, त्याचबरोबर एक चमत्कारही झाला. त्या तिघांना तेथे श्रीगणेशाची मूर्ती दिसली. कनिपक्कम गणपती चे दर्शन घेताच तिन्ही भावांचे अपंगत्व नाहीशे झाले. ही चमत्कारिक बातमी गावातील राहणणाऱ्या लोकांना समजताच ते सर्वजण हा अद्धभुत चमत्कार पाहण्यासाठी तेथे जमले. त्यानंतर सर्व लोकांनी प्रकट झालेल्या गणेश मूर्तीची तेथे पाण्यातच स्थापना केली. त्यानंतर आकराव्या शतकात चोळ राजा कुलोतुंग चोळ प्रथम यांनी या मंदिराची स्थापना केली.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *