कटाची आमटी / पुरणाची आमटी 

नेवैद्य रेसिपी

साहित्य:
१/४ कप चणाडाळ (महत्त्वाची टीप १)
ताजा कुटलेला मसाला
१ टेस्पून सुक्या खोबर्‍याचा किस,
१/२ टिस्पून जिरे,
१ ते २ काळी मिरी,
१ ते २ लवंगा,
१ लहान तमालपत्र, आणि
अगदी छोटा दालचिनीचा तुकडा (टीप २).
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, ४ कढीपत्ता पाने
१ टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टेस्पून गूळ
१ टेस्पून ओला खवलेला नारळ
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:

१) चणाडाळ कूकरमध्ये नेहमीप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावी.
२) खोबर्‍याचा किस, जिरे, मिरी, लवंगा, दालचिनी आणि तमालपत्र असे वेगवेगळे मंद गॅस वर थोडावेळ २ ते ३ थेंब तेल टाकून भाजून घ्या. खलबत्त्यात कुटून त्याची पूड करावी.
३) चणाडाळ व्यवस्थित घोटून घ्यावी. एका पातेल्यात २ ते २/५ चमचे तेल गरम करून, मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी तयार
करून घ्यावी . त्यात डाळ फोडणीस घालावी. गरजेनुसार पाणी घालावे.
४) आमटीला उकळी फुटली कि कुटलेला किंवा मिक्सर मध्ये वाटून घेतलेला मसाला चमचाभर घालावा आणि गोडा मसाला घालावा. ढवळून चिंचेचा कोळ आणि गूळ घालावे. चवीपुरते मिठ घालावे. आमटी घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवावे.
५) एका उकळीनंतर आमटीची चव पाहावी गरज वाटल्यास कुटलेला किंवा मिक्सर मध्ये वाटून घेतलेला मसाला घालून थोडावेळ उकळावे.
६) ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एक ते दोन मिनिटे मंद गॅस करून आमटी उकळून द्यावी .
ही कटाची आमटी पुरणपोळी सोबत खाताना तोंडी लावण्यासाठी असते तसेच गरमागरम तूपभातावर ही कटाचीआमटी ही उतकृष्ट लागते.
तसेच ही कटाची आमटी आदल्या दिवशी करून ठेवली आणि दुसर्‍या दिवशी खाल्ली तर ती छान मुरते आणि अजून त्या कटाची आमटीची एक चविष्ट चव लागते.

टीप:
१) हि आमटी बर्‍याचदा केली पुरणपोळी कि करतात. जर तुम्ही पुरणपोळी करणार असाल तर चणाडाळ शिजवताना थोडेशे जास्त पाणी टाकून डाळ शिजवून घ्यावी . पाणी भांड्यात निथळून घ्यावे. जर निथळलेले पाणी १ कपभर असेल तर १/२ कपभर शिजवलेली डाळ बाजूला काढून घ्यावी आणि वर दिलेल्या कृतीनुसार (स्टेप २ पासून) कटाचीआमटी करावी.
२) दालचिनीच्या तुकड्याऐवजी दालचिनीची पूड सुद्धा मिळते ती सुद्धा वापरली कटाच्या आमटी साठी वापरली तरी चालेल, दालचिनी न भाजता थेट कटाच्या आमटीत घालावी.दालचिनीची पूड चिमूटभरच वापरावी.
३) करून ठेवलेला ताजा मसाला वापरल्याने कटाच्या आमटीला चव अप्रतिम येते. थोडी मेहनत लागली तरी चालेल, पण ताजा मसाला वापरल्याने चवीत फारच फरक पडतो. जर ताजा कुटलेला मसाला वापरायचा नसेल तर १ चमचा ऐवजी २ चमचे गोडा मसाला कटाच्या आमटी साठी वापरावा शकतो .
४) बरेचजण वेगळ्या पद्धतीने ही आमटी बनवतात. घोटलेली डाळ पाणी टाकून एकसारखी करून घ्यावी त्यात चवीनुसार गूळ व चिंचकोळ घालावी ,ताजा कुटलेला मसाला व गोडा मसाला, मीठ, खवलेला नारळ असे एकत्रित मिश्रण करून पातेल्यात उकळत ठेवावी. छोट्या कढईत फोडणी तयार करून ती वरून आमटीवर टाकावी आणि अजून ५ ते १० मिनटे उकळु दयावी .
५) काहीजणांना या कटाच्या आमटीत कांद्याची चव आवडते, अशावेळी फोडणी देतांनी बारीक चिरलेला कांदा (१/२ कप) घालून २ ते ५ मिनिटे परतुन घ्यावे.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

घावन घाटले बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *