पुणे जिल्ह्यातील मोरेश्वर (मोरगाव) हे गणेशाचे देवस्थान आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वात प्रथम गणपती म्हणजे मोरेगाव चा मयुरेश्वर. मोरेगाव च मयूरेश्वराचं मंदिर हे सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिल साहाचा काळात ह्या मंदिराचे बांधकाम केले होते . सुभेदार गोळे हे पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा होते.
मोरेश्वराचे मंदिर हे एक प्रशस्त मंदिर आहे. हे मंदिर काळ्या दगडापासून बांधले गेले आहे. आसन बहामनी काळात बांधले होते . गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराला चारही बाजूंनी उंच स्तंभ आहेत. मोगलांच्या काळात मंदिरावर हल्ला होऊ नये म्हणून मंदिराला मशिदी सारखा आकार दिला होता. मंदिराच्या बाजूला 50 फूट उंच संरक्षण भिंत आहे. गाभारामधील मयुरेश्वराची मूर्ती विराजमान, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अतिशय आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे जडवले आहे . डोक्यावर नागराजाचा फणा आणि मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला रिद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती, त्यानंतर मुषक आणि मोराच्या मूर्ती आहेत.
असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर कहर केला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी शेवटी गणेशाची पूजा केली, गणेशाने मोरावर स्वार होऊन येथे सिंधू राक्षसाचा वध केला. त्यामुळे गणेशाला मयुरेश्वर हे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्याने त्याला मोरेगाव असे म्हणतात.या मंदिरात मयुरेश्वरासोबतच रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्तीही आहेत. ब्रह्मदेवाने या मयुरेश्वराची दोनदा मूर्ती तयार केली असे म्हणतात. पहिली मूर्ती तयारकेल्यानंतर ती सिंधुसुराने फोडली. म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा मूर्ती निर्माण केली.मयूरेश्वराची सध्याची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती आहे असे म्हंटले जाते. मूर्ती लहान वाळू आणि लोखंडी कण आणि हिऱ्यांनी बनवली आहे. या मंदिराचे आणखी एक विशेषता म्हणजे या मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे. असे म्हणतात की नंदीची मूर्ती रथात बसवून शंकराच्या मंदिरात नेली जात होती, मात्र येथे पोहोचताच रथाचे चाक तुटले. त्यामुळे हा नंदी येथे ठेवण्यात आला होता.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
कनिपक्कम मंदिर ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा