साहित्य:
२ वाट्या बारीक रवा
१ वाटी पाणी
दिड वाटी साखर
१/२ वाटी साजूक तूप
१ लहान चमचा वेलची पूड
कृती:
१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.
२)पातेल्यात साखर टाकावी आणि गरजेनुसार पाणी एकत्र करून एकतारी पाक तयार करून घ्या. [साखर वितळली कि पाण्याला उकळी फुटेल आणि ३ ते ४ मिनिटात एकतरी पाक तयार होईल .]. भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.
३) हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. तासाभरात मिश्रण आळते. मग लाडू वळावेत. (टीप ३)
टीपा:
१) जर लाडू चे मिश्रण फटफटीत झाले असतील तर अर्धी वाटी पाणी घेऊन लहान भांड्यात उकळऊन घ्यावे. त्यात २-३ चमचे साखर घालावी. पाक बनवून तो मिश्रणात घालावा. मिक्स करावे. थोड्या वेळाने लाडू वळावेत.
२) रव्याच्या लाडवांसाठी शक्यतो बारीक रवा घ्यावा.
३) साखरेचा पाक जर एकतारी झाला नसेल तर मिश्रण लवकर घट्ट होते. म्हणून त्यावर लक्ष ठेवावे. लाडू तयार करण्या इतपत घट्ट झालेअसेल तर तुपाचा हात लावून लाडू वळावे.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
बेसनलाडू बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा