सांजोऱ्या

नेवैद्य रेसिपी

साहित्य :

सारणीसाठी : १ वाटी बारीक रवा .

१/२ वाटी नारळाचा चव.

१ वाटी गुळ.

२ चमचे खसखस.

१चमचा जायफळपूड.

( केशर व सुकामेवा हवा असल्यास पूड करून घालावा)

तूप आवश्यकतेनुसार.

पारासाठी :

अर्धी वाटी बारीक रवा.

पाव वाटी मैदा.

तेल व मीठ.

कृती :

प्रथम खसखस भाजून कुटून घ्यावी. थोड्या तूपावर रवा भाजावा. नारळाचा चव मिक्सरमध्ये फिरवून नंतर त्याला भाजून जरा कोरडा करावा. नंतर रवा, नारळ, गुळ, खसखस व जायफळपूड एकत्र करावी. सारण करून झाकून ठेवावं.

रवा व मैद्याचे एकत्रित रित्या मिश्रण करून त्यात मीठ व भरपूर मोहन घालावं. व घट्ट पीठ मळून घ्यावं. अर्धा मळलेले पीठ तास भर झाकून ठेवावं. नंतर तेलाचा हात लावून छान मळून घ्या त्या नंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरून सांजोरी लाटावी. तव्यावर थोडी भाजून नंतर भरपूर तूप सोडून खमंग भाजावी. मस्त खमंग, खुसखुशीत सांजोरी तयार. सांजोरी लाटताना त्यात हवा राहू नये म्हणून अगदी अलगद लाटावी व भाजताना फुगू नये याची काळजी घ्यावी . तव्यावर तूप घातल्याने घरभर मस्त सुगंध पसरतो.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

करंजी बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा