नेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा?

पूजा विधी

हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायणना च्या रुपात पुजले जाते यालाच ‘सत्यनारायण ची पुजा ‘ असे म्हणतात.

विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख स्पष्ट केला आहे . यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोक आहेत. सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय म्हणजे संकल्प करणे आणि दुसरा म्हणजे प्रसाद.

सत्यनारायणाच्या कथेत अनेक लहान लहान खंडांत विभागल्या कथा समाविष्ट आहे . यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यात जास्त सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे नियमितपणे पालन करत नाही, त्याचे आयुष्यात फार नुकसान होईल, असे ही कथेत लिहिले आहे .

सत्याचे पालन न करणाऱ्याला देवी देवतांचं स्वतःच शिक्षा देतील असेही या कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते.  

सत्याची नारायनाच्या स्वरुपात पूजा करणे हे या कथेचे सारंश आहे. नारायण हेच सत्य असून बाकी सगळे जग मोह-माया आहे, तेव्हा नारायणाच्या पूजेत आपले मन रमवा आणि सत्याची धारणा करा, असा चांगला सल्लाही सत्यनारायणाच्या कथेतून आपल्याला मिळतो.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

सत्यनारायण पूजा म्हणजे काय? याचे महत्व जाणून घेण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *