श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

प्रसिद्ध मंदिर

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला अर्पिलेले असणारे पुण्यातील एकमेव हिंदू मंदिर आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक शरण येऊन जातात . दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक उच्चशिष्ठीत भाविक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा ही समावेश होतो, जे वार्षिक दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी सोहळ्या येथे उपस्थित असतात.
दगडूशेठ हलवाई गणपती च्या मंदिरात मुख्य श्री गणेश मूर्तीचा दहा मिलियन रकमेचा विमा उतरवला जातो . हे मंदिर १३० वर्षे जुने आहे. २०१७ मध्ये या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने १२५ वर्षे धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.

गणपतीच्या मूर्तीचा इतिहास

सन १८९३

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एकमेव सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते . श्रीमंत व सत्यप्रत होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर हे त्यांची राहण्याची इमारत होती. त्याकाळात पुणे या शहरा मध्ये आलेल्या भयंकर प्लेगच्या रोगामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे निधन झाले. त्याच्या मुलाचे निधन झाल्यामुळे ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही खूप दुःखी झाले. त्या दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देण्याचा प्र्यन्त केला आणि सांगितले की, आपण काहीही काळजी करू नका, तुह्मी एक दत्ताची आणि एक श्री गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची नित्यनियमाने सेवा/पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा व त्याचे पालनपोषण करा. भविष्यात जसे आपले अपत्य ने आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल केले त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. श्री.माधवनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व श्री गणपतीची शाडू मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या दोनीही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व श्रीमंत व सत्यप्रत लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील ११ मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजाअर्चा चालू असते.

इ .स.वि १८९४ या साली (बाळ गंगाधर टिळक) लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. इ . स.वि १८९६ या साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व त्या बनवलेल्या दुसऱ्या गणेश मूर्ती चा उत्सव/जलोष होऊ लागला. त्यावेळेसच श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे डोळे मिटले . परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा/प्रथा त्या परिसरातील राहणाऱ्या भाविकांनी व कार्यकर्त्यांनी पुढे तशीच सुरू ठेवली आहे. त्यावेळेसच्या काळात हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून प्रसिद्ध होता. गणपती उत्सवाच्या रीति व पद्धति तरुण पीडी मंडळ पुढे चालू ठेवत होते. सध्या श्री गणपती ची मूर्ती आपल्या कोंढवा या गावात आहे. कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री या वृद्धाश्रमातील मंदिरात स्थापित केली आहे.

इ.स.वि १८९६ साली बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची अवस्था थोडी खंडित झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून गणपतीची लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना गणपती ची मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविणायत आली व सर्वानुमते ती गणपती ची मूर्ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम सुरू केले.गणपती ची पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्यावेळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी गणपती ची मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा/अर्चा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळीवेळेस ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका झाला होता.

हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला.

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा

गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *