
पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. ॠषीपंचमीच्या दिवशी आज सकाळी हजारो महिलांनी एकत्रितपणे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केलं. गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे गेली अनेक वर्षे अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबवण्यात येतो.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण

ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी मनोभावी अनुभविला.गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगलसमयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.पारंपारिक वेशात महिलांनी हजेरी लावली होती.या सगळ्या महिलांच्या सुरांमुळे प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.
